

Punha Ekda Sade Made Teen New Release Date Announce
esakal
Marathi Entertainment News : ३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट आता पुन्हा एकदा तेवढ्याच जोशाने आणि तेवढीच धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे थोड्या प्रतीक्षेनंतर, लवकरच कुरळे बंधूंची धमाल आणि गोंधळ प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.