

Human Cocaine Trailer Out
esakal
Marathi Entertainment News : ‘ह्युमन कोकेन’चा ट्रेलर अखेर विविध माध्यमांवर प्रदर्शित झाला असून काही क्षणांतच प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. धक्कादायक दृश्यांची मालिकाच जणू या ट्रेलरमध्ये उलगडत जाते. गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा व्यापार आणि अस्तित्वासाठी सुरू असलेल्या निष्ठूर संघर्षाच्या लपलेल्या जगाचे उघड, क्रूर आणि निःसंकोच चित्रण यातून दिसते.