VIDEO: अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या 'अंगारों' गाण्यावर थिरकले ऐश्वर्या आणि अविनाश नारकर; भन्नाट डान्सची होतीये चर्चा

Pushpa 2 Angaaron Song: अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या 'अंगारों' गाण्यावर थिरकले ऐश्वर्या आणि अविनाश नारकर; भन्नाट डान्सची होतीये चर्चा
Aishwarya Narkar and Avinash Narkar sakal

Aishwarya Narkar and Avinash Narkar: अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा पुष्पा-2 (Pushpa 2: The Rule) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरमध्ये अल्लू अर्जुनचा हटके अंदाज बघायला मिळाला. अशातच आता या चित्रपटातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यापैकी 'अंगारों' नावाच्या गाण्यात अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे. अशातच आता या गाण्यावरील रिल्स विविध नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

नुकताच अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे 'अंगारों' या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.

अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या 'अंगारों' गाण्यावर थिरकले ऐश्वर्या आणि अविनाश नारकर; भन्नाट डान्सची होतीये चर्चा
Rinku Singh: फ्लावर नहीं फायर है... केकेआरच्या रिंकू सिंगचा 'पुष्पा-पुष्पा' गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा भन्नाट डान्स

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते दोघे 'अंगारों' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी या व्हिडीओला "वाईब हैं"

पाहा व्हिडीओ:

कधी रिलीज होणार पुष्पा-2?

पुष्पा-2 मधील पुष्पा राज आणि 'अंगारों' ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. या दोन्हीही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. पुष्पा-2 हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 500 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे, असं म्हटलं जात आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com