Salman Khan to Enter Pushpa 3?
esakal
अर्जुनच्या 'पुष्पा' फ्रेचायझीने भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळाच ठसा उमटवला आहे. पहिला आणि दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्याने ही मालिका केवळ दक्षिण भारतापुरती मर्यादित न रहता हिंदी सिनेसृष्टीतही प्रचंड लोकप्रिय झाली. पुष्पराज ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली असून, आता चाहत्यांची नजर 'पुष्पा'च्या तिसऱ्या भागाकडे लागली आहे.