
News : तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुनीता विल्यम्स यांचं अखेर पृथ्वीवर आगमन झालं. त्यांच्या आगमनाची संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत होतं. फ्लोरिडाच्या समुद्रकिनाऱ्यावर सुनीता स्पेसमधून सुखरूप परतल्या. त्यामुळे जगभरातील लोकांनी त्यांचं स्वागत केलं आणि आनंद व्यक्त केला. बॉलिवूड अभिनेता आर माधवननेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या.