

गेल्या काही काळापासून ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण चित्रपटांची लाट आली आहे. त्यातच थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट 'फुले' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी ज्योतिबा फुलेंची भूमिका साकारत आहेत, तर अभिनेत्री पत्रलेखा सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात लहान सावित्रीबाईंची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे बालकलाकार राधा धारणे हिला.