RAJ HANCHANALE BECOMES FATHER
esakal
SANAI CHOUGHDE FAME RAJ HANCHANALE EMOTIONAL POST: झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ मालिकेतील जय म्हणजेच अभिनेता राज हंचनाळे याच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. १९ ऑक्टोबरला पत्नी मॉलीने गोंडस मुलीला जन्म दिला. राजने बाबा झाल्याचा आनंद व्यक्त करत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. लेकीच्या जन्मानंतर ९ दिवसांनी त्याने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली.