बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते राज कुमार यांचं सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयातून वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. राज कुमार सिनेसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांचा प्रवास अत्यंत वेगळा होता. कुलभूषण पंडित असं त्यांचं नाव होतं. 1950 च्या दशकात त्यांनी माहिम पोलिस स्टेशनमध्ये मुंबई पोलिसात सब- इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते.