Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

Raj Thackeray: मुलाखतीत राज ठाकरेंनी त्यांना आवडणाऱ्या चित्रपटांबद्दल तसेच चित्रपटांमधील सीन्सच्या बारकाव्यांबद्दल सांगितलं.
Raj Thackeray
Raj Thackerayesakal

Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे राजकारणी असले तरी त्यांना कलेची आवड आहे, हे अनेकांना माहित आहे. राज ठाकरे हे विविध मुलाखतींमध्ये चित्रपटांबद्दल भरभरुन बोलतात. कलाकार आणि चित्रपटांबद्दल ते सोशल मीडियावर देखील पोस्ट शेअर करतात. अशताच आता बोल भिडू या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी त्यांना आवडणाऱ्या चित्रपटांबद्दल तसेच चित्रपटांमधील सीन्सच्या बारकाव्यांबद्दल सांगितलं.

राज ठकरे यांनी बोल भिडू या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, "मला फिल्म मेकिंगची आवड आहे. काही लोक म्हणायचे शोले 25 वेळा पाहिला, मग आम्ही मजेत त्यांना म्हणायचो,"समजला नाही का?" मी चित्रपट वेगवेगळ्या अँगलनं बघतो. मी गांधी चित्रपट बऱ्याचवेळा पाहिला. एखादी गोष्ट एखाद्या फिल्ममेकरला कशी सुचली? याबद्दल मी विचार करत असतो."

शक्ती चित्रपटामधील सीनबद्दल काय म्हणाले राज ठाकरे?

शक्ती चित्रपटातील सीनबद्दल राज ठाकरेंनी सांगितलं, "तुम्ही शक्ती चित्रपट पाहिला असेल, त्या फिल्ममध्ये अमिताभ बच्चन यांना अटक करण्यात आलेली असते. त्यांच्या आईला मारलेलं असतं. त्यांचे आईवर प्रचंड प्रेम असतं. त्यांच्या वडिलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये द्वंद्व असतं. पण शेवटी वडील हे वडील असतात. त्यांच्या आईला मारलेलं असतं त्यामुळे त्यांना तुरुंगातून घरी आणलेलं असतं, शक्ती चित्रपटाच्या या सीनमध्ये एकही डायलॉग नाहीये. त्याच्यात दोन एक्सप्रेशन्स आहेत. अर्थातच ही गोष्ट दिग्दर्शकाच्या किंवा लेखकाच्या मनात आली असेल.

पुढे राज ठाकरे म्हणाले, "त्या सीनमध्ये दिलीप कुमार खाली बसलेले असतात. तिथे अमिताभ बच्चन येतात, ते जास्त रडत नाहीत फक्त वडिलांचा हात पकडतात. त्यानंतर ते वडिलांचा हात आवळतात, हात धरण्यात दु:ख व्यक्त करण्याची भावना आहे आणि आवळण्यात राग आहे. तिथून बाहेर पडल्यानंतर ते पळून जातात आणि आईच्या मारेकऱ्याला शोधतात, तो सीन पहिला पाहिजे. बऱ्याच चित्रपटातील सीन्स मला आवडतात."

Raj Thackeray
Raj Thackeray: गेल्या १८ वर्षात मनसेच्या इंजिनाचे तब्बल इतक्या वेळा बदलला ट्र्रॅक! वाचा सविस्तर

राज ठाकरेंना आहे गाण्याची आवड

तुम्ही संगीत दिलेलं गाणं कधी रिलीज होणार? असा प्रश्न देखील राज ठाकरे यांना मुलाखतीत विचारण्यात आला. याबद्दल ते म्हणाले, "मला गाण्याचा छंद आहे. पण मला त्याचं क्रेडिट घ्यायला आवडत नाही. कलेचा आनंद घेता आला पाहिजे, या गोष्टी मी केल्यात, हे सांगण्याची काही गरज नसते."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com