RAJA SHIVAJI
esakal
RAJA SHIVAJI BOX OFFICE COLLECTION: रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमानं सिनेमागृहात इतिहास रचला आहे. १ मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनी हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळताना पहायला मिळतोय. या सिनेमानं ५ दिवसात जवळपास ४७.५० कोटींची कमाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित हा सिनेमा आहे. सध्या सिनेमागृहामध्ये प्रेक्षकांची गर्दी पहायला मिळतेय.