

पचास पचास कोस दूर जब बच्चा रोता है, तो टकलू हैवान आजाता है... हा डायलॉग ९०च्या मुलांमध्ये फार लोकप्रिय होता. महेश कोठारे यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'थरथराट' चित्रपट आणि याच चित्रपटातील गावागावात पोहोचलेला खलनायक म्हणजे टकलू हैवान. तो आणि त्याची टक्कल असलेली गँग ही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. विशेषतः छोट्या मुलांमध्ये या गँगची विशेष क्रेझ होती. चित्रपटातील टकलू हैवान म्हणजेच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत या चित्रपटाच्या काही आठवणी सांगितल्या होत्या.