लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत; सौरव गांगुलीच्या भूमिकेत राजकुमार रावचा दमदार लूक

RAJKUMMAR RAO AS SOURAV GANGULY:अभिनेता राजकुमार राव आता भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'दादा: द सौरव गांगुली स्टोरी' या बायोपिकचा फर्स्ट लूक समोर आलाय.
RAJKUMMAR RAO AS SOURAV GANGULY

RAJKUMMAR RAO AS SOURAV GANGULY

esakal

Updated on

DADA THE SOURAV GANGULY STORY FIRST LOOK: एकाच साच्यात अडकून न राहता प्रत्येक वेळी एक नवीन व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांमध्ये राजकुमार रावचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. 'शाहिद'मधील न्यायासाठी लढणारा वकील, 'न्यूटन'मधील तत्त्वांशी तडजोड न करणारा सरकारी कर्मचारी, 'ट्रॅप्ड'मधील जगण्यासाठी संघर्ष करणारा तरुण, 'बरेली की बर्फी'मधील रंगतदार स्वभावाचा प्रीतम आणि 'स्त्री' मालिकेतील विकी अशा विविध भूमिकांमधून त्याने अभिनयाची वेगळी उंची गाठली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com