Jigra Box Office Collection : राजकुमारच्या सिनेमासमोर फिकी पडली आलियाच्या जिगराची जादू ; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

Alia Bhatt Starrer Jigra Movie Box Office Collection : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला राजकुमार रावचा 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' आणि आलियाचा 'जिगरा' हे सिनेमे रिलीज झाले. जाणून घेऊया या सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन.
Box Office Collection
Box Office Collection Esakal
Updated on

Bollywood Entertainment News : काल 11 ऑक्टोबरला राजकुमार रावचा विकी विद्या का वो वाला व्हिडीओ आणि आलिया भट्टचा जिगरा हे दोन सिनेमे रिलीज झाले. बॉक्स ऑफिसवर टक्कर झालेल्या या दोन्ही सिनेमांमध्ये कडवी स्पर्धा रंगली आहे. विकी और विद्या या सिनेमात राजकुमार आणि तृप्ती डिमरीची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहेत तर जिगरा या सिनेमात बहीण भावाची एक भावनिक कथा पाहायला मिळणार आहे. दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस आले आहेत. आलियाच्या या सिनेमाचं समीक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे पण बॉक्स ऑफिसवर मात्र प्रेक्षकांच्या मताचा कौल काहीतरी वेगळा दिसतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com