Rakhi Sawant Goes Viral in Ravan Avatar on Dussehra
esakal
Bollywood News: बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. तिचे वेगवेगळ्या आवतारातील व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. अशातच आता राखी सावंत दुबईहून पुन्हा आपल्या विनोदी अंदाज भारतात परतली. यावेळी तिने दसऱ्याच्या मुहुर्तावर रावणाचा वेश केला होता. दहा डोकी घेऊन राखी रस्त्यावर फिरत होती. तिच्या या आवताराचं व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. याच वेशात राखी छम्मक छल्लो या गाण्यावर डान्स करताना सुद्धा पहायला मिळाली.