अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी; चित्रपटांच्या नावाखाली परदेशात पैसा पाठवत असल्याचा संशय

Rakul Preet Income Tax raid: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंग, वासू भगनानी यांच्या स्टुडिओसोबत घरावर आयकर विभागाची धाड पडलीये.
rakul preet singh house income tax raid

rakul preet singh house income tax raid

esakal

Updated on: 

सध्या बॉलिवूडमधून एक मोठी बातमी समोर येतेय. आज बॉलिवूड कलाकारांच्या घरावर इनकम टॅक्स विभागाच्या लोकांनी कारवाई केलीये. त्यात प्रामुख्याने बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंग, वासू भगनानी यांची नावं समोर आलीयेत. रकुलप्रीत ही वासू भगनानी यांची सून आहे. ती अभिनेत्री असून त्यांच्या व्यवसायात देखील मदत करते. वासू भगनानी हे बॉलिवूडमधील खूप मोठे निर्माते आहेत. त्यांची कंपनी त्यांचा मुलगा जॅकी भगनानी सांभाळतो. वर्षभरापूर्वीच त्यांच्यावर खूप मोठं कर्ज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता त्यांच्या घरावर आणि कंपनीवर आयकर विभागाची धाड पडलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com