DEEPIKA CHIKHALIA AND MUKESH KHANNA REACTION ON RAMAYAN
Esakal
रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या भूमिका असलेला 'रामायण' चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटातील भव्य दृश्ये आणि युद्धप्रसंग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतानाच, सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवीच्या अॅक्शन दृश्यांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. रामानंद सागर यांच्या १९८७ मधील 'रामायण' मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी या दृश्यांबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मुकेश खन्ना यांनी संताप व्यक्त केलाय.