थोडक्यात :रामायण सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांकडून सकारात्मक आणि भरभरून प्रतिसाद मिळत आहे.टीझरने देशभरात उत्सुकता निर्माण केली असून याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.सिनेमातील भव्य सेट, अभिनय आणि कथा मांडणीने लोकांची विशेष दाद मिळवली आहे..Bollywood News : नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ देशातील नऊ प्रमुख शहरांमध्ये भव्य पद्धतीने लॉन्च करण्यात आली आणि त्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यासारखा होता. ५००० वर्षांपूर्वीची ही कथा जगभरातील २.५ अब्जांहून अधिक लोक श्रद्धेने मानतात, म्हणूनच रामायण ही केवळ एक गोष्ट नाही, ती एक संस्कृती, एक परंपरा आहे. ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ ची झलक देशभरातील थिएटरमध्ये दाखवण्यात आली, ज्यामुळे प्रेक्षक केवळ खूश झाले नाहीत, तर त्या अनुभवाशी आत्मीयतेने जोडले गेले..पहिल्यांदाच, ऑस्कर विजेते दोन दिग्गज – हान्स झिमर आणि ए. आर. रहमान एकत्र आले आहेत, एक अनोखी आणि भव्य सिने-संगीत रचना करण्यासाठी. IMAX साठी खास चित्रीत करण्यात आलेली ही रामायण अशा एका अनुभवासारखी भासते, जी प्रेक्षकांना एका गूढ आणि गहन जगात घेऊन जाते. त्यामुळे ही फक्त एक चित्रपट नाही, तर मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन कथांपैकी एकाची आत्मा अनुभवण्याची एक अद्वितीय संधी आहे..जेव्हा निर्मात्यांनी सोशल मीडियावर थिएटर्समधील काही दृश्ये शेअर केली, जिथे प्रेक्षक टाळ्यांच्या गजरात, आश्चर्यचकित चेहऱ्यांनी ‘रामायण’ ची झलक पाहत होते, ते दृश्य अक्षरशः अंगावर शहारा आणणारे होते. चाहत्यांनी याला “अद्भुत”, “भव्य” आणि “गूजबम्प्स देणारे” असे संबोधले. अनेकांनी तर हे देखील म्हटले की, जे अपेक्षित होते, त्यापेक्षा हे खूपच भव्य आणि जबरदस्त निघाले..या प्रतिक्रिया दाखवणाऱ्या झलक व्हिडिओसोबत निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे: “दुनियाभरातून मिळणाऱ्या प्रेमासाठी मनःपूर्वक आभारी आहोत.\#Ramayana: The Introduction ला जो प्रतिसाद आणि प्रेम मिळाले, ते खरोखर भावनिक करणारे आहे — आम्हा सर्व कलाकारांनी आणि टीमने मनापासून यावर काम केले आहे.आता जे येणार आहे, ते याहूनही खास असेल.” #Ramayana #RamayanaByNamitMalhotraदिवाळी 2026 आणि 2027 मध्ये — संपूर्ण जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार..भारताकडून जगाला एक सांस्कृतिक देणगीनमित मल्होत्रा निर्माते आणि DNEG चे सीईओ, सांगतात, “रामायण हा केवळ एक चित्रपट नाही, तर हे एक सांस्कृतिक चळवळ आहे. आपण आपली परंपरा जागतिक पातळीवर नव्या सादरीकरणात आणतो आहोत. आतापर्यंत रामायण विविध प्रकारे पाहिलं गेलं आहे, पण आता आपण त्याला एका अशा भव्य आणि प्रगत रूपात आणतोय, जे जागतिक चित्रपटमंचावर भारताची ओळख ठरू शकेल.”.नितेश तिवारी , दिग्दर्शक, म्हणतात, “ ही कथा आपल्यात खोल रुजलेली आहे. ती केवळ पौराणिक नसून एक शाश्वत सत्य आहे. यामध्ये भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. हा आत्मा सांभाळून, जागतिक स्तरावर तिचं नव्या भव्यतेत सादरीकरण करणं हे माझं कर्तव्य आणि सन्मान आहे.”.FAQs : प्रश्न: रामायण सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांनी कसा प्रतिसाद दिला?उत्तर: टीझरला प्रेक्षकांनी खूप चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.प्रश्न: टीझरबद्दल सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आहेत?उत्तर: टीझर सोशल मीडियावर ट्रेंड होत असून प्रेक्षक त्याचे कौतुक करत आहेत.प्रश्न: टीझरमध्ये प्रेक्षकांना काय विशेष आवडलं?उत्तर: भव्य सेट, उत्तम व्हिज्युअल्स, अभिनय आणि प्रभावी कथा मांडणी प्रेक्षकांना विशेष भावली.प्रश्न: टीझर देशभरात किती लोकप्रिय झाला आहे?उत्तर: टीझर देशभरात लोकप्रिय झाला असून त्याला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज आणि शेअर मिळत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.