

ramayana box office
esakal
भव्य व्हीएफएक्स, दमदार कलाकार आणि रामायणातील प्रभावी प्रसंगांमुळे 'रामायणम् पार्ट १ 'ने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जोरदार सुरुवात केली असून भारतासह परदेशातही हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. ४ हजार कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये आणि ५९ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. भगवान राम, रावण आणि सीता यांसह रामायणातील प्रमुख पात्रांचे भव्य चित्रण आणि दमदार व्हीएफएक्स हे चित्रपटाचे खास आकर्षण ठरत आहे. रणबीर कपूरने भगवान रामाची भूमिका साकारली असून यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. दोघांच्याही भूमिका प्रभावी असल्याची चर्चा आहे.