नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित पौराणिक चित्रपट 'रामायण' चा फर्स्ट लुक व्हिडिओ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर भगवान राम, तर साई पल्लवी माता सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत पहायला मिळाले आहेत. हा कास्टची ओळख करुन देणारा व्हिडिओ प्रदर्शित होताच, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झालीय. चाहत्यांकडून चित्रपटाच्या दृश्यांची आणि कलाकारांच्या निवडीची प्रचंड प्रशंसा करत आहेत.