Shivaji Maharaj’s Escape from Agra to the Big Screen in ‘Ranapati Shivray
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत कळावा यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'शिवराज अष्टक' ही संकल्पना सुरु केली. महाराजांचा इतिहास आणि त्यातील ज्वलंत अध्याय या शिवराज अष्टक संकल्पनेतून रुपेरी पडद्यावर सादर करण्यात येणार आहे. यातील ‘फर्जंद’, 'फत्तेशिकस्त', ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज, सुभेदार’ ही पाच चित्रपुष्प प्रेक्षकांच्या भेटीला आली, आणि या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांचं उदंड प्रेम मिळालं.