काही दिवसातच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. सध्या ते दोघेही मुंबईमधील 'वास्तू' बिल्डिंगमध्ये राहत आहेत. या घरामध्येच त्यांचे लग्न झाले होते. मात्र आता हे दोघेही नवीन घरात राहण्याच्या तयारीत आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये रणबीर कपूर आणि आलिया यांनी आपल्या मनासारखे नवीन घराची डिझाईन तयार करून नवा बंगला तयार केला आहे. मागच्या काही वर्षांमध्ये त्यांनी घराची पूर्ण कामे हवी तशी करुन घेतली आहे.