

Rang De Basanti Special Screening
esakal
Bollywood News : राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावी चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाने केवळ फिल्ममेकिंगची भाषा बदलली नाही, तर सामाजिक जाणीवांशी निगडित कथा मांडण्याच्या शैलीलाही नवी दिशा दिली. आमिर खान, आर. माधवन, सिद्धार्थ सूर्यनारायण, सोहा अली खान, शर्मन जोशी, कुणाल कपूर, अनुपम खेर आणि अतुल कुलकर्णी यांसारख्या दमदार कलाकारांनी सजलेला हा चित्रपट आजही एक नेशनवाइड फेनोमेनन ठरला असून, आपल्या ताकदवान कथानकामुळे आणि निर्भीड मांडणीमुळे तो सतत चर्चेत राहतो आणि प्रेक्षकांशी खोलवर नाते जोडतो.