Ranu Mondal's struggle with memory loss and poverty five years after gaining sudden fame
esakal
Bollywood News: सोशल मीडियावर काही न काही व्हायरल होत असतं. कधी कधी त्या व्हायरल गोष्टीमुळे कोणाचं नशीब बदलतं तर काही जणांचं सार काही धुळीच मिळतं. पाच वर्षापूर्वी असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो होता रानू मंडल हिचा. रानू मंडल त्या व्हिडिओमध्ये लता मंगेशकर यांचं सुरेख आवाजात गाणं गाताना पहायला मिळाली होती. त्यांनतर तिचं आयुष्यचं बदलून गेलं. त्या एका गाण्यामुळे तिला घर मिळालं, पैसा मिळाला, प्रसिद्धी मिळाली. परंतु ते रानू मंडलला काही टिकवता आलं नाही. रानू सध्या सगळं काही गमावून बसली आहे. तिची हालत पाहून ती वेडी झाली की काय अशा चर्चा होताना पहायला मिळतेय.