प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन समय रैना याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोची एक क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया याने आई-वडिलांच्या शारिरीक संबंधावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दरम्यान आता रणवीरने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सर्वांची माफी मागितली आहे.