

Bollywood actor Ranveer Singh
esakal
Bollywood actor Ranveer Singh receives a death threat : बॉलिवूडमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर आता, बॉलिवूडचा स्टार रणवीर सिंहला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आला आहे. हा मेसेज व्हॉट्सअॅप व्हॉइस नोटद्वारे पाठवण्यात आला होता, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली होती.
धमकीच्या या मेसेजनंतर मुंबई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. शिवाय, रणवीर सिंहच्या घराबाहेर सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. सध्या पोलिस धमकीची व्हॉइस नोट पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत. तर व्हॉइस नोट पाठवणाऱ्याने तो बिश्नोई टोळीचा असल्याचा दावा केलाय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याआधी ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार झाला होता. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर यापूर्वी बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावरही गोळीबार झाला होता. लॉरेन्स बिश्नोई टोळीने गोळीबार केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.