RANVEER SINGH
esakal
RANVEER SINGH ACCUSED OF LEAVING DON 3 BEFORE SHOOTING STARTED: अभिनेता रणवीर सिंह हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. धुरंधर सिनेमाच्या यशानंतर बॉलिवूडमध्ये त्यांची बरीच चर्चा रंगली. दरम्यान अशातच आता याच्याविरोधात फेरडेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईनं मोठं पाऊल उचललंय. रणवीर सिंहवर नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव जारी करण्यात आला असून संपूर्ण इंडस्ट्रीला त्याच्यासोबत काम न करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. दिग्दर्शक फरहान अक्तर यांच्या डॉन ३ सिनेमाच्या वादामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आलाय.