

Ranveer Singh Mimicking Shreya Ghoshal
sakal
Ranveer Singh Shreya Ghoshal Mimicry Video: रणवीर सिंह एक एव्हरग्रीन आणि नेहमीच उत्साही असणारा सेलिब्रिटी आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या धुरंधर द रिव्हेंजमुळे तो चर्चेत होत, मात्र आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. कारण तितकंच मजेशीरही आहे.
मुंबईतल्या नीता मुकेश अंबानी कलात्मक केंद्राच्या (NMACC) तिसऱ्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात रणवीर सिंहने सगळ्यांना हसवलंय. कार्यक्रमात त्याने श्रेया घोषालनेच गायलेलं गाणं गात तिच्या आवाजाची मजेशीर नक्कल करताना दिसला आहे. यामुळे चाहत्यांचं चांगलंच लक्ष वेधलं आहे.