Ranvir Shorey : 'इंडस्ट्रीत टिकून राहायचं असेल तर तुम्हाला...' रणवीर 'बॉलीवूड पॉलिटिक्स'वर थेटच बोलला!

सनफ्लॉवर नावाच्या मालिकेमध्ये रणवीरनं केलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.
Ranveer Shorey News
Ranveer Shorey Newsesakal

Sunflower 2 Actor Ranvir Shorey opens up on Bollywood Politics : ओटीटी मनोरंजन विश्वात सध्या एका मालिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या मालिकेचं नाव सनफ्लॉवर. सध्या या मालिकेचा दुसरा सीझन चाहते अन् नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय आहे. या सगळ्यात मालिकेतील कलाकार सुनील ग्रोव्हर, अदा शर्मा आणि रणवीर शौरी हे चर्चे आले असून रणवीरच्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अदा शर्माच्या हटक्या भूमिकेचे कौतुक होत आहे. सनफ्लॉवरमध्ये तिची झालेली एंट्री अनेकांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. अदानं तिच्या भूमिकेनं चाहत्यांना जिंकून घेतले आहे. रणवीरनं त्यात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. यापूर्वीही रणवीरच्या वेगवेगळ्या भूमिकांचे चाहत्यांनी कौतुक केले आहे. बॉलीवूडमधील व्हर्सेटाईल अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले आहे.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या रणवीरनं आता बॉलीवूडमधील पॉलिटिक्सवर भाष्य केलं आहे. त्यानं आपली भूमिका आणि स्क्रिप्ट सिलेक्शन सारख्या गोष्टींतही किती राजकारण होतं याविषयी सांगितलं आहे. त्या मुलाखतीमध्ये रणवीरला त्याच्या फिल्मी करिअरविषयी विचारण्यात आलं होतं. तो म्हणतो माझा प्रवास हा फार चढ उताराचा राहिला आहे.

तुम्हाला खरं सांगतो माझा स्वभाव हा काही फार प्रामाणिक नाही. मी जे काही सिलेक्शन करतो ते मी करु शकणार नाही या भावनेतून होतं. जेव्हा तुम्हाला बिल देण्याची वेळ येते आणि तुमच्याकडे फारसे काम नसेल अशावेळी तुम्हाला जे समोर येईल त्यात काम करावे लागते. मी नेहमीच वेगळ्या भूमिका करण्यावर भर दिला आहे. अर्थात त्याचे श्रेय हे त्या स्क्रिप्टरायटरला द्यावे लागेल. ओटीटीवर काम करणाऱ्या रणवीरनं या माध्यमाला वरदान असे म्हटले आहे.

Ranveer Shorey News
Amaltash Film Review : राहुल देशपांडे मुख्य भूमिकेत | Rahul Deshpande | Entertainment

ओटीटी हे अधिक लोकाभिमुख आहे. त्याचा कॅनव्हास मोठा आहे. फार कमी वेळेत ते लोकांपर्यत जाणारे माध्यम आहे. २०२२ मध्ये मी खूप काम केले होते. मग झालं असं की, २०२३ मध्ये माझ्याकडे फारसं काम नव्हतं. त्यामुळे २०२४ कसे जाईल हेही मला माहिती नाही. पण जे आहे ते एखाद्या रोलर कोस्टरसारखी राईड आहे.

बॉलीवूड आणि बॉलीवूडमधील मोठे स्टार्स यांच्याविषयी बोलताना तो म्हणाला की, इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर प्रतिभा आणि प्रचंड मेहनत याला पर्याय नाही. तुम्हाला तुमचे मार्केटिंग आणि नेटवर्किंग यावर काम करावे लागेल. मला असे वाटते की, मी यात फारसा चांगला नाही. दुसरी गोष्ट बॉलीवूडमधील राजकारणाशी दोन हात कसे करायचे हेही मला माहिती नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com