
अभिनेत्री रवीना टंडनची कन्या राशा थडानीने यावर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘आझाद’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण यांचा पुतण्या अमन देवगण प्रमुख भूमिकेत होता, तर अजय देवगण स्वतःही महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.