Rashmika Mandanna Post: 'पुष्पा'च्या अटकेवर 'श्रीवल्ली'नं सोडलं मौन, पोस्ट शेअर करत रश्मिकानं प्रशासनाला धारेवर धरलं, म्हणाली...

Rashmika Mandanna post on Allu Arjun: हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली होती. अल्लू अर्जुनला हायकोर्टातून जामीन मिळाला आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाची नायिका रश्मिका मंदान्ना हिनेही अल्लू अर्जुनच्या अटकेवर पोस्ट केली आहे.
Rashmika Mandanna post on Allu Arjun
Rashmika Mandanna post on Allu ArjunESakal
Updated on

'पुष्पा 2' चे स्पेशल स्क्रिनिंग 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटर, हैदराबाद येथे आयोजित करण्यात आले होते. मात्र, प्रीमियर सुरू असताना अल्लू अर्जुन अचानक तेथे पोहोचल्याने चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी आज चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्यांना उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मिळाला आहे. त्याचवेळी, आता अल्लूची को-स्टार रश्मिका मंदान्ना हिने या संपूर्ण घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com