Rashmika Mandanna Says “Men Should Feel Period Pain Too”
esakal
Rashmika Mandanna Viral Comment : सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिची भरपूर चर्चा रंगताना दिसत आहे. विजय देवरकोंडासोबत ती लवकरच लग्न करत असल्याच्या चर्चेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. २३ फेब्रुवारीला ती उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं बोललं जातय. दरम्यान अशातच आता रश्मिकाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तिने मासिक पाळी आणि त्यात स्त्रियांना होणाऱ्या रात्राबद्दल सांगितलं आहे. तसंच पुरुषांनी सुद्धा त्या वेदना अनुभवल्या पाहिजेत असं ती म्हणाली.