Rashmika Mandanna’s 'The Girlfriend' Gets Poor Reviews
esakal
रश्मिका मंदाना ही नेहमीच तिच्या उत्तम अभिनयामुळे ओळखली जाते. तिने अनेक चित्रपटात आपल्या वेगवेगळ्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलय. तिने छावा सिनेमात साकारलेली येसूबाईची भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड भावली. सध्या ती तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. ती लवकरच विजय देवरकोंडासोबत लग्नगाठ बांधणार आहे. परंतु यापूर्वी तिच्या द गर्लफ्रेंड सिनेमातील तिच्या अभिनयावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केलीय. तिचा अभिनय बघून प्रेक्षकांनी तिच्यावर टीका केलीय.