आता आम्ही तिघे आहोत... लग्नानंतर महिन्याभरातच विजय-रश्मिकाने दिली आनंदाची बातमी; उंचावल्या चाहत्यांच्या भुवया

RASHMIKA VIJAY DEVERKONDA SHARES GOOD NEWS:लोकप्रिय दाक्षिणात्य जोडपं रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी लग्नाच्या महिन्याभरातच चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीये.
RASHMIKA MANDANA

RASHMIKA MANDANA

ESAKAL

Updated on

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा यांनी महिन्याभरापूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न केलेलं. नॅशनल क्रश असलेली रश्मिका आणि विजय यांनी राजस्थानमधील उदय[पूर येथील आयटीसी मेमेंटोस इथे धुमधडाक्यात लग्न केलेलं. त्यांच्या लग्नाला महिनाही होत नाही तोच या जोडप्याने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिलाय. त्या दोघांनीही एक पोस्ट शेअर केलीये. जी पाहून प्रेक्षक संभ्रमात पडलेत. त्यांच्या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्यात त्यांनी आम्ही आता तिघे असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे चाहते चकीत झालेत आणि रश्मिका गरोदर आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com