रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला २३ लाखांचा गंडा; नेपथ्यकारानेच फसवलं, कसं? नेमकं काय घडलं?

RATRIS-KHEL-CHALE-FAME ACTRESS GET FRAUDED: 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीला तब्बल २३ लाखांना फसवलं गेलं. अनेकदा फोन करूनही त्याचा काही उपयोग झाला नाही.
ratris khel chale

ratris khel chale

esakal

Updated on

कलाकारांना इंडस्ट्रीत अनेकदा फसवणुकीचा अनुभव येत असतो. अनेकदा प्रोड्युसर पैसे बुडवतात. कधी कलाकार सायबर क्राइममध्ये आपले पैसे गमावतात. तर काही मोठ्या कलाकारांनी दुसऱ्या कलाकारांनीच आपले पैसे बुडवले असल्याची कबुली दिली आहे. असाच अनुभव छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका 'रात्रीस खेळ चाले' मधील अभिनेत्रीला देखील आलाय. काही मालिका कधीही प्रेक्षकांच्या विस्मरणात जात नाहीत त्यातलीच एक म्हणजे 'रात्रीस खेळ चाले'. यातील माई म्हणजेच अण्णा नाईकांची पत्नी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मालिकेत माईंची भूमिका शकुंतला नरे यांनी साकारली होती. आता शकुंतला यांनी त्यांची २३ लाखांना फसवणूक झाल्याचं सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com