KRITIKA TULASKAR ON APURVA NEMLEKAR
Esakal
APURVA NEMLEKAR PODCAST SPARKS SHEVANTA ROLE CONTROVERSY: 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील 'शेवंता'ची भूमिका अपूर्वा नेमळेकरने गाजवली. त्यानंतर काही मतभेद झाल्यामुळे तिने मालिका मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिच्या जागी कृतिका तुळसकरने भूमिका साकारली. दरम्यान अशातच अपूर्वाने एका पॉडकास्टमध्ये शेवंताच्या भूमिकेबाबत आणि तिच्या रिप्लेसमेंटबाबत भाष्य केलं. आता तिच्या आरोपांना शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री कृतिकाने सुद्धा सडेतोड उत्तर दिलय.