
Padma Shri Award Shocking Facts : भारत सरकारकडून विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी देण्यात येणारा पद्मश्री हा चौथ्या क्रमांकावरील महत्त्वाचा सन्मान आहे. भारतीय कलाक्षेत्रातील अनेक कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नुकताच मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना हा पुरस्कार जाहीर झाला. सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होतंय. ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची असली तरीही त्यामागची एक धक्कादायक बाजूही समोर आली आहे.