

RENUKA SHAHANE death scene in hum aapke hain kaun
esakal
लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या सोनी टीव्हीवरील 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतीच या शोमध्ये लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी हजेरी लावली होती. या तीनही अभिनेत्रींनी 'हम आपके है कौन' या चित्रपटात एकत्र काम केलेलं. आता या कार्यक्रमात बोलताना तिघींनीही या चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या. विशेष करून तो सीन जेव्हा रेणुका पायऱ्यांवरून पडतात आणि त्यांचा मृत्यू होतो. या सीनच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. रेणुका यांनी या सीनवरून त्यांच्या मैत्रिणीच्या मुलाची आठवण सांगितली. तर माधुरीने रिमा लागू यांची आठवण सांगितली.