

RENUKA SHAHANE
ESAKAL
आपल्या अभिनयाने आणि आपल्या सुमधुर हास्याने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटात काम केलं. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांची 'हम आपके है कौन' मधील भूमिका प्रचंड गाजली. रेणुका या कायमच आपले विचार बिनधास्तपणे मांडताना दिसतात. एका मुलाखतीत त्यांनी डोक्यावर पदर घेण्याबद्दल भाष्य केलंय. आपल्याला ती प्रथा आवडत नाही असं त्या म्हणाल्या आहेत. त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलंय.