
renuka shahane
esasakal
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही काम केलंय. 'हम आपके हैं कौन' चित्रपटातून रेणुका यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांचं मधाळ हसू प्रेक्षकांना आजही घायाळ करतं. त्यांनी आशुतोष राणा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलं आहेत. मात्र लग्नानंतर आशुतोष यांच्या पै- पाहुण्यांमुळे त्या वैतागल्या होत्या. आपण आणखी सहन करू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी ही गोष्ट आशुतोष यांना सांगितली होती. तेव्हा आशुतोष त्यांना काय म्हणालेले हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.