

RENUKA SHAHANE
ESAKAL
आपल्या निखळ हास्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा अभिनयातील प्रवास जवळपास तीन दशकांनंतर अतिशय सुंदररीत्या पूर्ण झाला. तब्बल ३० वर्षानंतर त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. तो देखील एक नाही तर दोन चित्रपटांसाठी. नुकताच फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड सोहळा पार पडला. यात रेणुका यांनी दोन फिल्मफेअर आपल्या नावावर केले. हा पुरस्कार मिळवल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात.