
गेले अनेक दिवस 'वॉर २' या चित्रपटाची चर्चा सगळीकडे रंगलेली होती. २०१९ मध्ये आलेल्या 'वॉर'चा हा सिक्वेल असल्यामुळे सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली होती. अखेर हा चित्रपट भव्य प्रमाणात सगळीकडे प्रदर्शित करण्यात आला आहे. आदित्य चोप्रा यांनी ही कथा लिहिली आहे आणि अयान मुखर्जीने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. मोठी स्टारकास्ट, अवाढव्य खर्च, आंतरराष्ट्रीय दर्जाची अॅक्शन, दमदार आणि खणखणीत संवाद, देश आणि परदेशातील विविध लोकेशन्स अशा काही बाबी या चित्रपटाच्या जमेच्या आहेत; परंतु कथानक फारसे आकर्षक नसल्यामुळे चित्रपट पाहताना म्हणावी तशी उत्सुकता वाटत नाही. या चित्रपटाची कथा पहिला भाग अर्थात वॉर या चित्रपटाची कथा जेथे संपते तेथून नवीन कहाणीला सुरुवात होते.