Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती म्हणते, ‘मी सध्या सिंगल आहे’; भावनिकदृष्ट्या परिपक्व जोडीदाराची इच्छा, पण शोईकच्या आधी लग्न नाही

‘मी सध्या सिंगल आहे, पण शोईकच्या आधी लग्न नाही’ म्हणत रिया चक्रवर्तीने भावाच्या लग्नाशी जोडलेली स्वतःची अट आणि भविष्यातील जोडीदारावरील अपेक्षा उघड केल्या
Rhea Chakraborty opens up about marriage plans and brother Showik

Rhea Chakraborty opens up about marriage plans and brother Showik

Sakal

Updated on

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि लग्नाविषयीच्या विचारांबद्दल स्पष्टपणे भाष्य केले आहे. नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये रिया तिचा भाऊ शोईक चक्रवर्ती, नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्यासोबत संवाद साधताना दिसली. यावेळी तिने सध्या आपण सिंगल असल्याचे सांगत, भविष्यातील जोडीदारामध्ये कोणते गुण हवे आहेत, याबद्दलही मनमोकळेपणाने मत व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com