

riteish deshmukh
esakal
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. काही दिवसांपूर्वी त्याचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने १०० कोटींच्या वर कमाई केली. मात्र या सिनेमाच्या सक्सेस पार्टीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात रितेश महाराजांचं चित्र असलेला टी शर्ट घालून पार्टीत नाचत होता. त्याने पार्टीत मद्यपान केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलेलं. हा महाराजांचा अपमान आहे असं म्हंटल गेलं. आता अखेर प्रकारांना वाढताना पाहून अभिनेत्याने या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलंय. मी कधीही मद्यपान करत नाही असं तो म्हणालाय.