RITEISH DESHMUKH REMEMBERS FATHER
esakal
RITEISH DESHMUKH REMEMBERS FATHER: मुंबईत 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी अनेक सेलिब्रिटी भावूक झाले होते. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमूख यांना सुद्धा अश्रू अनावर झालेलं पहायला मिळालं. यावेळी रितेशनं एक निर्माती म्हणून जिनिलियाचं कौतूक केलंय. 'ती नसती तर हा सिनेमा बनवणं शक्य नव्हतं' असं तो म्हणाला. त्याचं बोलणं ऐकताच जिनिलियाला अश्रू अनावर झाले.