अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया या जोडीचे लाखो चाहते आहेत. दोघेही नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतात. दोघांनाही नम्र स्वभावामुळं ओळखलं जातं. रितेश-जेनिलियांनी मुलांना सुद्धा तेच संस्कार दिले आहेत. पापाराझीसमोर आल्यास दोन्ही मुलं नेहमी हात जोडताना दिसतात. रितेश-जेनिलायाचा साधेपणा नेहमीच चाहत्यांना अनुभवायला मिळतो. परंतु सध्या सोशल मीडियावर रितेशचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो व्हिडिओ पाहून नेटकरी रितेशवर चांगलेच भडकले होते.