RITEISH DESHMUKH
esakal
RITEISH DESHMUKH INSTAGRAM POST: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याचा मोठा चाहतावर्ग आहे. तो नेहमीच्या त्याच्या डाऊन टू अर्थ स्वभावामुळे ओळखला जातो. दरम्यान अशातच रविवारी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये रितेश-जेनिलिया आले होते. यावेळी रेस्टॉरंटमधून बाहेर येताच पापाराझी त्यांच्याकडे फोटो काढण्यासाठी पुढे आले. यावेळी एका छोट्याशा प्रसंगाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलय.