

riteish deshmukh BBMARATHI 6
ESAKAL
कलर्स मराठीवरील सर्वाधिक गाजणारा कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस मराठी'. आतापर्यंत या कार्यक्रमाचे पाच सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. त्यातील ४ सीझनचं सूत्रसंचालन अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलंय. तर एका सीझनचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख याने केलंय. काही दिवसांपूर्वीच कलर्सने 'बिग बॉस मराठी ६' ची घोषणा केली. तर नुकतीच हा सीझनदेखील अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार आहे अशी पोस्ट करण्यात आलीये. त्यामुळे यावेळेस महेश मांजरेकर यांना होस्ट म्हणून पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांचा हिरमोड झालाय. असं असलं तरी नेटकऱ्यांनी रितेशला काही सल्ले दिलेत.