Rupali Bhosale Shares Video After Mercedes Car Accident
esakal
Rupali Bhosale Accident: मालिका विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले, तिने तिच्या अभिनयातून, वेगवेगळ्या मालिकांमधून वेगवेगळं पात्र साकारलं. तिच्या अभिनयाचं कौशल्य तिने तिच्या पात्रातून चाहत्यांना दाखवलं. 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना या पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. तिच्या नकारात्मक पात्राला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरुन प्रसिद्धी दिली. परंतु रुपाली भोसलेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. कारण रुपाली भोसलेच्या गाडीचा अपघात झालाय. तिने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिलीय.