Sabar Bond Marathi Movie Review
esakal
निवडुंगाचं पिकलेलं लालसर गोड चवीचं फळ ज्याला 'साबर बोंड' म्हणतात. कदाचित माझ्यासारख्या शहरी माणसांना याचं नाव माहिती नसावं कारण ते बाजारात मिळतंही नाही, शुष्क कमी पाण्याच्या भागातही सहजपणे वाढणारं हे कॅक्टस अर्थात काटेरी वर्गातल्या झाडाचं फळ. आकर्षक नसलेल्या या काटेरी झाडाचं फळ मात्र सुमधूर असतं, निसर्गानं त्यालाही सुरक्षेसाठी केसांसारख्या सुक्ष्म काट्यांनी कव्हर केलेलं असतं.