'नवरा माझा नवसाचा' नंतर २२ वर्षांनी एकत्र दिसणार सचिन पिळगांवकर-मधुराणी गोखले; चित्रपटाचं नाव वाचलंत का?

SACHIN PILGAONKAR MADHURANI GOKHALE NEW MOVIE: सचिन पिळगांवकर आणि मधुराणी गोखले सोबत एका अनोख्या "हिरो"ची मराठी सिनेसृष्टीत दमदार एंट्री झाली आहे.
kapuskonda

kapuskonda

ESAKAL

Updated on

चंदेरी दुनियेत ब्रेक मिळायला अनेक ऑडिशन्स द्याव्या लागतात. पण हा असा पहिला कलाकार आहे ज्याला ऑडिशन्स न देता थेट सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासोबत चित्रपटात काम करण्याची लॉटरी लागली आहे ते पण हिरो म्हणून. कोण आहे हा हिरो ? या हिरोच नाव आहे "कापूसकोंडा". हा एक गोंडस भुभु - कुत्रा आहे. आणि हेच या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर "कापूसकोंडा’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com